वाक्यांचे भाग (उद्देश / विधेय)
> लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या : शब्दांची अर्थपूर्ण मांडणी म्हणजे 'वाक्य' होय.
वाक्याचे दोन भाग पडतात. 1) उद्देश 2) विधेय
उद्देश : वाक्यात ज्याच्याविषयी सांगितले जाते ते उद्देश असते.
विधेय उद्देश्याबद्दल जी माहिती सांगितली जाते ते 'विधेय' असते. ● वाक्यातील उद्देश व विधेय कसे ओळखाल ?
1. प्रथम वाक्यातील क्रियापद शोधा.
2. क्रियापदातील धातूला णारा/णारी/णारे प्रत्यय जोडा.
3. प्रत्यय जोडून कोण काय प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते तो उद्देश भाग होय.
4. 'उरलेला भाग 'विधेय' असतो.
उदा. गणेश सुंदर चित्र काढतो.
काढणारा कोण ? गणेश
उद्देश = गणेश विधेय = सुंदर चित्र काढतो.
5. उद्देश व उद्देशांविषयी माहिती देणारा शब्द हा उद्देश सदरात येतो व उरलेले सर्व शब्द 'विधेय' येतात.
उदा. माझे वडील हुशार आहेत.
क्रियापद = आहेत
असणारे कोण = वडील (उद्देश)
नमुना प्रश्न
प्र. 1 खालील वाक्यातील उद्देश ओळखा.
"आमचा कुत्रा नॅन्डी बागेत खेळताना पडला.'
2 खालील वाक्यातील विधेय ओळखा.
भारताची राजधानी"दिल्ली ही भारताची राजधानी आहे.
प्र. 3 खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा भाग ओळखा.
'देवांगीने सुरेल गीत गायले.
प्र. 4 इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या. '
No comments:
Post a Comment