Bootstrap Example

Dropdowns

The .dropdown class is used to indicate a dropdown menu.

Use the .dropdown-menu class to actually build the dropdown menu.

To open the dropdown menu, use a button or a link with a class of .dropdown-toggle and data-toggle="dropdown".

Sunday, November 6, 2022

भीमसिंह महाराज पु्यतिथीनिमित्त- जीवनक्रम महिती

 


भीमसिंह महाराज (जन्म - इ.स. १९२३ नेकनूर, बीड मृत्यू - ९ नोव्हेंबरइ.स. २००३) हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व कीर्तनकार होते. भगवानबाबांच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील भगवानबाबांच्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून १९ जानेवारी, इ.स. १९६५ पासून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळली. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराच्या शिखराचे काम केले.

भीमसिंह महाराजांच्या वडिलांचे नाव निहालसिंह तर आईचे नाव तुळजाबाई होते. त्यांनी आळंदीस वारकरी शिक्षणसंस्थेत गीता आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला.

दिनांक १९ जानेवारी, इ.स. १९६५ यादिवशी भगवानबाबा यांचे निधन झाले. उत्त्तराधिकारी नेमल्याशिवाय त्यांचा पुढील विधी करता येत नव्हता त्यामुळे भगवानबाबांचे आवडते शिष्य म्हणून भीमसिंह महाराज यांना गादीवर बसण्याची विनंती केली गेली परंतु भीमसिंह महाराजांनी 'आपली भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची लायकी नाही' असे म्हणून गादीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे भगवानबाबांचे परममित्र बाबुलाल महाराज पाडळीकर यांनी सोनोपंत दांडेकर यांच्याकडे जाऊन आज्ञापत्र आणले. ते आज्ञापत्र पाहिल्यावर भीमसिंह महाराज गादीवर बसण्यास तयार झाले व भगवानबाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून भीमसिंह महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली.

संतश्रेष्ठ भीमसिंह महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची क्रांती केली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले. चालू असलेल्या अनिष्ठ रुढी, परंपरा, अंधश्रद्धा बंद केल्या. 

समाजप्रबोधन करून गुरुवर्य (वै.) भीमसिह महाराज यांच्या सहकार्याने मच्छिंद्रगड शिरूर कासार येथील पशुहत्या पूर्णपणे बंद करण्यात आली. भिमसिंह महाराजानंतर डॉं.नामदेव महाराज शास्री सानप हे महंत झाले.



No comments:

Post a Comment