*आयडियल टीचर अकॅडमी*
*कोण होणार ज्ञानपती?* (सामान्य ज्ञान)
*प्रश्न मंजुषा क्रमांक - ००१*
*गट - ५ वी ते ७ वी*
----------------------------------------
१) भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात?
👉 *सरदार वल्लभभाई पटेल*
२) लोकमान्य उपाधी कोणाची आहे?
👉 *बाळ गंगाधर टिळक*
३) लोकहितवादी उपाधी कोणाची आहे?
👉 *गोपाळ हरी देशमुख*
४) पुणे शहराचे पूर्वीचे नाव काय होते?
👉 *पुनवडी*
५) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती शहर आहे?
👉 *पुणे*
६) पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
👉 *मुळा - मुठा*
७) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ कोणत्या नावाने ओळखले जाते?
👉 *बालभारती*
८) पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
👉 *१३*
९) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळ कोणत्या शहरात आहे?
👉 *पुणे*
१०) पुणे विद्यापीठाचे नामकरण काय झाले आहे?
👉 *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*
----------------------------------------
*ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते*
No comments:
Post a Comment